Ad will apear here
Next
प्रेरणा
आयुष्य सगळेच जण जगत असतात; पण ते रडत-कुढत जगायचे की हसत-खेळत हे प्रत्येकाच्या स्वभावावर व विचारांवर अवलंबून असते. म्हणूनच आनंददायी जीवनासाठी विनोद अ. बांदोडकर यांनी ‘प्रेरणा’ या पुस्तकातून केलेले लेखन मार्गदर्शक ठरते.

रस्त्यात अपघातात जखमी झालेला अनोळखी मुलाला तातडीने रुग्णालयात नेऊन त्याचे प्राण वाचविणाऱ्या गरीब गृहस्थाचे उदाहरण देत परोपकारी माणसाचे दर्शन घडविले आहे. दुसऱ्या प्रसंगात पाळणाघर ते वृद्धाश्रमांच्या वाढत्या संख्येबद्दल विवेचन, मुलांचे अति लाड किंवा दुःस्वास न करता त्यांना समजावून घेण्याची गरज आदी अनेक लेखांमधून सकारात्मक जीवनाचे मोल समजते.

पुस्तक : प्रेरणा
लेखक : विनोद अ. बांदोडकर
प्रकाशक : शारदा प्रकाशन
पाने : १२०
किंमत : १२५ रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZSGBY
Similar Posts
प्रेमातून प्रेमाकडे मैत्रीत वयाचे बंधन नसते; पण काहीवेळा समाजबंधन असते. विशेषतः मैत्री स्त्री-पुरुषामधील असेल, तर हे नाते नितळपणे सांभाळावे लागते. सार्वजनिक क्षेत्रातील थोरामोठ्यांचे अतिशय नाजूक संबंधातील मैत्र अरुण ढेरे यांनी ‘प्रेमातून प्रेमाकडे’मधून वाचकांपुढे उलगडले आहे.
कवितेच्या शोधात कविता करणे हा अनेकांचा छंद असतो. कविता अनेक प्रकारच्या असतात. त्यातून प्रेम, माया, भक्ती, राग-लोभ, चीड, संताप अशा मनातील सर्व भावना व्यक्त होतात. संतांच्या रचना याही कवितेचाच एक भाग असतात. अशा अनेकविध काव्याचे व कवींचे रसग्रहण अरुणा ढेरे यांनी ‘कवितेच्या शोधात’ यातून केले आहे.
ही व्यवस्था काय आहे? गंभीर आणि महत्त्वपूर्ण विषयांवर राजीव कालेलकर यांनी केलेले विचारप्रवृत्त करणारे हे लेखन. या पुस्तकातील लेखांमध्ये अपंगत्व, दलित, स्त्रीप्रश्न, मैत्री, संगीत, मार्क्सवाद, संस्कृती इत्यादींवर भाष्य केले आहे.
एन to पी : नोटबुक टू प्रिस्क्रिप्शन रुग्णांच्यादृष्टीने डॉक्टर देव असतात; पण त्यांच्याही आयुष्यात सर्वसामान्यांप्रमाणे सुख-दुःख, ताण-तणाव, आनंदाचे, संकटाचे किंवा आर्थिक अडचणींचे प्रसंग येत असतात. अशा प्रसंगांना डॉ. सोपान चौगुले यांनी ‘एन to पी (नोटबुक टू प्रिस्क्रिप्शन)’ या पुस्तकातून शब्दरूप दिले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language